छत्रपती संभाजीनगरमध्ये अभियंता तरुणीवर अत्याचार, धर्म बदलून लग्नही लावले, तिघांविरोधात गुन्हा…

Share

V 24 Taas

छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अभियंता तरुणीवर अत्याचार करून बळजबरीने तिचे धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

ताहेर तय्यब पठाण, तय्यब शब्बीर पठाण, आणि आयेशा बाहेर पठाण, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ताहेर पठाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याने स्वतःचे नाव लपवून आणि अविवाहित असल्याचे सांगून पीडित तरुणीसोबत मैत्री केली.

काही दिवसांनी पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. इतकंच नाही तर, ११ फेब्रुवारी रोजी पीडितेचे बळजबरीने धर्मांतर देखील केले. आरोपीने पीडितेला तीन धर्मगुरूकडे नेऊन कपडे व केस जमा करण्यास लावले. तसेच तिला बळजबरीने प्रार्थना करण्यासही भाग पाडले.

कोऱ्या बॉण्डवर खोट्या सह्या घेऊन आरोपीने पीडितेसोबत लग्न केले. यानंतर तीन जणांनी मिळून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्याचबरोबर तिला मारहाण देखील केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी सातारा पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिकचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरातील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचेही धर्मांतर केल्याचा प्रकार सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला होता. त्यातच आता ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *