पहिल्याच सामन्यात विराटला इतिहास रचण्याची संधी! १ धाव करताच मोडणार IPL स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड

Share

V 24 Taas

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिलाच सामना सुपरहिट असणार आहे. या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे विराट कोहली. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला विराट कोहली या सामन्यातून कमबॅक करताना दिसूने येणार आहे. दरम्यान या सामन्यात त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे.

विराट कोहलीच्या नावे या स्पर्धेतील अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात १ धाव करताच त्याच्या नावे मोठा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे.

काय आहे खास रेकॉर्ड?

विराट कोहली हा आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करतोय. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात विराटने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना ९९९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात केवळ १ धाव करताच तो चेन्नईविरुद्ध खेळताना १००० धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे.

या आकडेवारी चॅम्पियन्स लीग स्पर्धेचाही समावेश आहे. केवळ आयपीएल स्पर्धेची आकडेवारी पाहिली तर, त्याला चेन्नईविरुद्ध १००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ १५ धावांची गरज आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईविरुद्ध खेळताना ९८५ धावा केल्या आहेत.

हे आहेत चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज…

१) शिखर धवन – १०५७ धावा

२) विराट कोहली-९८५ धावा

३) रोहित शर्मा – ७९१ धावा

४) दिनेश कार्तिक – ६७५ धावा

५ डेव्हिड वॉर्नर – ६४४ धावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *