V 24 Taas
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले व बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा या गावाचे मूळ रहिवासी असलेल्या विजयभाऊ भुतडा यांनी सातपुडा पर्वत रांगेत जनजागरणाचे काम केले व झुंजार कार्यकर्ता म्हणून ते जीवन जगले.काल त्यांच्या जाण्याने माझा अतिशय जिवलग आवडता मित्र व माझा मोठा बंधू काळाच्या पडद्याआड झाला.भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य व खामगांव जिल्ह्याचे विशेष निमंत्रित सदस्य हे दायित्व त्यांचे कडे होते.माझा विजूभाऊंचा संपर्क गेल्या २३ वर्षांपासूनचा.स्वभावात स्पष्टता व कणखरपणा सोबतच शांत व मिलनसार सर्वांना सोबत घेऊन चालणे नेहमी लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे संघाच्या गीता नुसार “सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले” या गीता नुसार सेवेचे काम विजूभाऊ करीत त्यामध्ये शेतकरी गरीब कष्टकरी वनवासी जनजातीय बंधू कामगार इत्यादी लोकांचे सेवे करिता ते नेहमी तयार असतं.घरचे सधन शेतकरी व्यापारी असून कोणताही अहंकार व गर्व भाऊं मधे कधीच जाणवला नाही.सर्व लोक आपलेच आहेत ही भावना त्यांची असायची त्यांचे सोबत अनेक वेळा मी प्रवास केला.सोबत राहून पक्ष संघटनेचे काम करतांना विजुभाऊंचा राजकीय सामाजिक अभ्यास होता.खामगांव येथील एम एस महाविद्यालयात बि.एस.सी.त्यांनी केली.शेती विषयात सुध्दा त्यांना चांगली माहिती होती.राजकीय समिकरणे वा विश्लेषण अनेक बाबी मला विजूभाऊं कडून शिकायला मिळाल्या.सातपुडा पहाडपट्टीतील विविध जनजाती सोबत त्यांचे घनीष्ठ सबंध होते.हिंदुत्वाच्या कामा करिता अनेक वेळा त्यांचे नेतृत्वा मधे मेळावे आयोजित केले गेले.दरवर्षी फगवा महोत्सवात विशेष योगदान विजु भाऊंचे असे.जामोद येथील वनवासी सेवा समिती चे ते संचालक होते.सोबतच हिंदु जागरण मंच व भाजपा व्यापारी आघाडी चे सुध्दा ते जिल्हाध्यक्ष राहिले होते.विविध संस्थांचे अध्यक्ष वा सदस्य ते होते.२०१७ साली महाराष्ट्र राज्याचा हिंदु धर्म रक्षक पुरस्कार त्यांना हिंदु युवा वाहिनी व समस्त हिंदु आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने दिला गेला होता.गेल्या तीन वर्षांपासून ते किडनी चे आजाराने ग्रस्त होते तरी सुध्दा ते डगमगले नाहीत त्यांचे आत्मबळ प्रबळ होते.ते सांगायचे युद्धात नरवीर बाजीप्रभूंना ८३ जखमा अंगावर झाल्या असताना ही हा वीर डगमगला नाही.त्यामुळे हे शरीर आहे चालायचेच.त्यांचे आजारपणात सौ.शोभाताई वहिनी साहेब त्यांच्या तीन मुली भाऊ प्रकाशभाऊ,सुरेशभाऊ,प्रदीपभाऊ व पुतणे गौरव,राम,लखन,राज यांनी आजारपणात रात्र दिवस सेवा करून त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले परंतु नियतीला हे मान्य झाले नाही.ते आपणा सर्वांना सोडून निघून गेले त्यांच्या जाण्याने त्यांचेवर प्रेम करणारे सर्व परिचित हळहळले व सर्वांच्या मनाला चटका लाऊन ते गेले. मा.मंत्री तथा जळगांव जामोद मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ.संजयजी कुटे यांचे विजूभाऊ विश्वासू व जवळचे सहकारी होते त्यांना जेव्हा भाऊ गेल्याची दुःखद बातमी समजली त्यांना फार वाईट वाटले.असा हा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा निखळ प्रेमाच्या मनाचा माणूस गेल्याने सर्वांनाच अतीव दुःख झाले..शेवटीं एवढेच..श्रध्येय विजूभाऊ अमर रहे अमर रहे..आप याद है..याद रहेंगे..
प्रकाश बोदडे जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.शिक्षक आघाडी खामगांव बुलढाणा निवास सोनाळा..९९६०६५३५४६