V 24 Taas
ठाकरे गटाने बुधवारी सकाळी लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी राज्यातील पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहेलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात मंगळवारी वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र राज्य समितीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी राज्य समितीने आठ नावे निश्चित केली आहेत.
1)रामटेक –
2)भंडारा-गोंदिया- संजय गजानंद केवट
3)गडचिरोली-चिमूर -हितेश पांडुरंग मडावी
4)चंद्रपुर – राजेश वारलुजी बेले
5)बुलढाणा – वसंत राजाराम मगर
5)अकोला- प्रकाश यशवंत आंबेडकर
6)अमरावती – कुमारी पर्जक्ता तारकेश्वर पिल्लेवान
7) वर्धा- प्रा.राजेंद्र साळुंके
8)यवतमाळ-वाशीम – सुभाष खेमसिंग पवार