पियुष गोयल यांच्याविरोधात वंचितकडून उमेदवारी जाहीर; राजकीय समीकरणं बदलणार…

Share

V 24 Taas

मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी अवघ्या दोनच जागांवर महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यातील उत्तर मुंबईच्या जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पियुष गोयल यांच्याविरोधात वंचितकडून विनासिंग यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतार्यंतच्या इतिहासात उत्तर मुंबईत उत्तर भारतीय व्यक्तीला पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर झाली आहे.

उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेऊन उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवार देऊ नका, अशी विनंती देखील करणार असल्याचे विनासिंग यांनी म्हटलं आहे. महिला आणि शिक्षण या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचं विना सिंग यांनी म्हटलं आहे.

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून गेली दोन टर्म पूनम महाजन खासदार आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना, आरपीआय अशा एक ना अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी साथ दिलीये. २०१४ साली विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आणि त्या लोकसभेत पोहोचल्या.

मुंबई उत्तर मध्य लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात विले पार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश आहे. त्यापैकी कुर्ला हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *