आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकली अवकाळीची मदत; शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली…

Share

V 24 Taas

काही दिवसांपूर्वी राज्यात लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आचारसंहिता लागल्यामुळे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे रखडले आहेत.बाधित पिकांसाठी निधीची मागणी थांबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाबाधित पिकांच्या निधीसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील तीन हजार हेक्‍टरवरील गहू, हरभरा आणि फळ पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. परंतु या बाधित क्षेत्रांचे पंचनामे अद्याप सुरू झाले नाहीत.यातच आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही सर्व प्रक्रिया थांबलेली आहे.

शेतकऱ्यांची मदत रखडली

आपत्तीमध्ये धारनी आणि चिखलदरा तालुक्यातील 2278 हेक्टरमधील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आला आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू,हरभरा काढणीला आलेला असताना शेतकऱ्यांवर संघट आले होते. हरभऱ्याची सोंगणी करून काही भागात गंजी लावल्या होत्या मात्र अवकाळी पावसाने हरभराचे मोठे नुकसान झाले होते.मात्र, चार जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा प्रशासन शासनाकडे मदतीची मागणी करणार का? शेतकऱ्यांना मदत मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आचारसंहिता आता शेतकऱ्यांसाठी मोठी अडसर ठरत आहे. आता ४ जूनपर्यंत आचारसंहिता आहे. त्यामुळे या कालावधीत पिकांचे पंचनामे होणार नाहीत. शेतकऱ्यांची मदत रखडली आहे. अगोदरच अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. त्यावर आता आचारसंहितेचं ग्रहण लागल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *