V 24 Taas
बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राचा मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नक्की काय घटना आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय युवकावर त्याच्या २७ वर्षीय मित्रानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील २३ वर्षीय युवकावर त्याचा २७ वर्ष मित्र मागील एक वर्षापासून अनैसर्गिक अत्याचार करत आहे. पीडित तरूणाने त्याचा मित्र भगवान प्रमोद वाघ याच्या विरोधात बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.
या घटनेतील तक्रारदार आणि आरोपी दोघेही चांगले मित्र आहेत. आरोपीवर वर्षभरापासून अनैसर्गिक अत्याचार होत आहे. वारंवार केलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून तक्रारदार युवकाने अखेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सध्या पीडित तरूण अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भगवान प्रमोद वाघ यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक २०४/२०२४ कलम ३७७ सहकलम अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मित्रानेच असं पाऊल उचलल्यामुळे सर्वांना धक्का बसत आहे.