V 24 Taas
रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने 11 मार्च रोजी गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त‘आनंदाचा शिधा’ वितरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता आनंदाचा शिधा मिळणार नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद राहणार आहे. आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध करण्यात आला आहे.
राज्य सरकारने दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सण, उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे आता पुढील दोन महिने त्यांना आनंदाचा शिधा मिळणार नाही.
आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय
दीड वर्षाच्या कालावधीत एक किलो साखर, अर्धा किलो रवा, मैदा, एक किलो तेल, चणाडाळ या वस्तूंचा संच तयार केला होता. तो शिधावाटप दुकानातून लाभार्थींना सणाच्या काळात वाटप केला जात होता. या संचासाठी १०० रुपये आकारण्यात येत होता. आता होळी, गुढीपाडवा सण उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. परंतु आता आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला आहे.
निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशावरून लाभार्थींना शिधावाटप दुकानातून देण्यात येणारे वस्तूंचे संच आचारसंहिता संपेपर्यंत म्हणजेच ७ जूनपर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला
आनंदाचा शिधा योजनेला आचारसंहितेचा अडसर
होळी, गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्याचे राज्य सरकारचे नियोजन होते. परंतु त्याला आता आचारसंहितेचा अडसर आला आहे.
आनंदाच्या शिध्याचा लाभ 1 कोटी 69 लाख शिधा पत्रिकाधारकांना मिळतो. परंतु ऐन सणाच्या तोंडावरच आता त्यांना हा शिधा मिळणार नाहीये. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा योजना गरीब आणि गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी सुरू केली आहे.