मलकापुर येथे मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाजाच्या वतीने परंपरेने गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

Share

V 24 Taas

विजय वर्मा

मलकापूर प्रतिनिधी :- शहरातील मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाजातील कुमारीका नवविवाहितेचा व सौभाग्यवती महिलांनी धार्मिक परंपरेने सोळा दिवस चालणारा गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. भारतीय संस्कृती संपूर्ण जगात सण उत्सवांची संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. शिव पार्वतीचा धार्मिक उत्सव शिव म्हणजे गण आणि माता पार्वती म्हणजे गौर असे गणगोर हा सण उत्सव कुमारिका,नवविवाहित आनंदात व उत्साहात श्रद्धेने सोळा दिवस साजरा करत असतात. गणगौर उत्सवाचे मलकापुर येथील हॉटेल सारथी इंटरनॅशनल येथे मैढ क्षत्रिय स्वर्णकार समाजाच्या महिलामंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने आपल्याला चांगला वर मिळावा, यासाठी सोळा दिवस शिवजींची कठोर पूजा-तपश्चर्या केली होती. त्यामुळे शिवजी हे प्रसन्न झाले व त्यांनी माता पार्वतीलाच पत्नी म्हणून स्वीकारले. या पौराणिक कथेनुसार दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे रंगपंचमी पासून सोळा दिवस लहानांपासून नवविवाहिता पर्यंत सर्व मुली ग्रुप बनवून दररोज गण म्हणजे शिव आणि गौर म्हणजे माता पार्वतीची पूजा करतात.

या गण गौर उत्सवामध्ये मलकापुर मैढ क्षत्रिय सुवर्णकार समाजातील असंख्य युवती पारंपरिक वेशभूषा धारण करित गणगोर पूजन उत्सवात सहभागी झाल्या होत्या. तर उत्सवाच्या सोळाव्या दिवशी शहरातील हाॅटेल सारथी इंटरनॅशनल येथे विविध उपक्रम राबवून शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढून गणगौर उत्सवाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *