V 24 Taas
नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिघोरी येथील जयमाता प्रा. शाळा मतदान केंद्रावर एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समजलंय. Booth no.246 येथे 8.10 मिनिटांनी मतदान सुरू झालं आहे.
1 तास 10 मिनिट मतदानाला उशीर
मतदान केंद्रावर मतदारांची बाहेर रांग लागलेली असताना तब्बल 1 तास 10 मिनिटे मतदान उशिराने सुरू झालेय. यावेळी मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. नगरसेवक पिंटू झलके यांनी या प्रकरणी आक्षेप घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला.
पूर्ण युनिट बद्दलले
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने पूर्ण युनिट बद्दलविण्यात आले. जयमाता प्रा. शाळा मतदान केंद्रावर Booth no.246 येथील ईव्हीएम मशीन बदलण्यात आलंय. आज पहिल्याच दिवशी अशी समस्या आल्याने पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन वरून नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे.
नागपूरमध्ये महायुतीकडून भाजपचे नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत सुरू होत आहे. त्यामुळे आता गडकरी नागपुरात हॅट्रिक मारणार की विकास ठाकरे विकासरथ आपल्या हाती घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गडचिरोलीत २ तास उशिराने मतदान
गडचिरोलीमध्ये सकाळी ७ वाजता मशीन बिघडल्याने मतदान सुरू झालं नाही. पुन्हा मशीन दुरुस्त करून आणल्यावर देखील हा घोळ कायम राहिला. त्यामुळे मतदानासाठी आलेले नागरिक बराच वेळ रांगेत उभे राहून घरी परत निघून गेले.