धक्कादायक; चुलत्यानेच केला 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार, असा उघडकीस आला प्रकार..

Share

V 24 Taas

बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नराधमाने एका आपल्याच 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन पीडिता ही गरोदर राहिली असून तिची प्रसूती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चुलत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळाल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या मोठ्या बहिणीचे जुलै 2023 मध्ये लग्न होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य लग्नाच्या कामात व्यस्त होते. यावेळी पीडिता ही चुलत बहिणीसोबत एका खोलीत झोपली होती. याच खोलीत तिचा चुलताही झोपला होता. याचदरम्यान पीडितेला धमकी देत चुलत्याने तिच्यावर अत्याचार केला. भीतीपोटी पीडितेने याबाबत कोणालाही काहीही सांगितलं नाही. 

त्यानंतर पीडिता ही आपल्या आई-वडिलांसह ऊसतोडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेली. सहा महिने ऊस तोडण्यात मदतही केली. दोन दिवसांपूर्वी काम संपल्याने हे सर्व लोक गावी परत येत होते. त्यावेळी पीडितेला कळा सुरू झाल्या. 

तीला तातडीने एका रूग्णालयात दाखल केले असता तेथे सोनोग्राफी करून लगेच तिची प्रसुती करण्यात आली. तिने एका मुलीलाही जन्म दिला असून त्यानंतर याप्रकरणाला वाचा फुटलीय. दरम्यान, नराधम चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *