V 24 Taas
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी एका निवडणूक सभेला संबोधित ते म्हणाले आहेत की, ”तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशातील 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ते 24 तास त्या 22 लोकांना मदत करत असतात. बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यातील लोक तुम्हाला सांगतील की मुख्य मुद्दा बेरोजगारी आणि महागाईचा आहे.
यावरी उपस्थित लोकांना राहुल गांधीनी विचारले की, तुम्ही कधी माध्यमांनी बेरोजगारी, महागाईवर बोलताना पाहिले आहे का? माध्यमे तुम्हाला फक्त पंतप्रधान मोदींना समुद्राच्या तळाशी जाताना किंवा मंदिरात प्रार्थना करताना दाखवेल. प्रसारमाध्यमांना बेरोजगारी आणि महागाईशी काहीही देणेघेणे नाही.
‘प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देणार’
यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, ”आम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे, आम्हाला तुमची मदत करायची आहे. नरेंद्र मोदी उद्योजकांना पैसे देऊ शकतात तर काँग्रेस गरीबांना पैसे देऊ शकते. त्यामुळे आम्ही ‘महालक्ष्मी’ हे नवीन धोरण आणत आहोत.”
ते म्हणाले, ”निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच अंमलबजावणी केली जाईल. दारिद्र्यरेषेखालील (BPL) आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेची निवड करू आणि आमचे सरकार प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देईल. तसेच आम्ही एका वर्षात महिलांना एकूण एक लाख रुपये देणार आहोत.”