आयुष्यातलं दारिद्र्य कायमचं संपेल…; होळीच्या आधी घरात या वस्तू नक्की घेऊन या…

Share

V 24 Taas

महाराष्ट्रासह देशभरात धुळवड मोठ्या उत्साहात सादरी केली जाते. यंदा २५ मार्चला धुलीवंदन आहे. तर २४ मार्चला होलिका दहन होणार आहे. होळी साजरी करताना दहनाच्या दिवशी सर्वांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. हा नैवेद्य होळीला देखील दाखवला जातो त्यानंतर प्रसाद म्हणून सर्वजण खातात.परिसरात अनेक ठिकाणी लाकडी ओंडके एकत्र करून होलिका दहन केलं जातं. याला शिमगा असेही म्हणतात. होलिका दहन म्हणजे आपल्या घरातील, मनातील, आजुबाजूच्या वाईट विचारांचा नाष होय. आतापर्यंत आलेल्या सर्व अडचणी या अग्नित सोडून पुढे जायचे असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी किंवा त्या आधी आपल्या घरात पुढील पैकी काही वस्तू असणे फार गरजेचे आहे. या वस्तूंमुळे तुमच्या घरात देखील सुख, शांती आणि धनसंपत्ती भरभरून येईल.

चांदीचं किंवा सोन्याचं नाणं :

चांदी आणि सोनं यामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करत असतो. महाराष्ट्रात प्रत्येक सनाला विशेष महत्व आहे. सनाच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही भविष्यात सोन्याचा मोठा दागिना बनवणार असाल तर त्यासाठी प्रत्येक सनाला थोडं थोडं घेतलेलं सोनं कामी येईल.

तोरण :

हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. तुम्ही देखील झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात कोणत्याही नकारात्मक उर्जेचा शिरकाव होत नाही. आपल्या घरात सुख शांती नांदते.

कासव:

वास्तुशास्त्रात कासवाला फार महत्व आहे. जिवंत किंवा धातूपासून बनवलेला कासव नेहमी घरात असावा. हे कासव तुम्ही एका भांड्यात पाणी भरून त्यात कासव ठेवू शकता. यामुळे घरात धनसंपत्तीची भरभराट होते.

बांबुचे रोप :

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धनसंपत्तीची भरभराट व्हावी यासाठी बांबुचे रोप काम करते. सुरुवातीला हे सोप तुम्ही घरात पाण्यामध्ये वाढवा. थोडी वाढ झाल्यावर रोप एका मातीच्या कुंडीत लावा. हे रोप जितकं वाढतं तितकी धनसंपत्ती आणि पैशांची भरभराट होते. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरी होळीच्या आधी हे रोप लावू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *