दूषित पाणी पिल्याने २ महिलांचा मृत्यू; कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा आरोप
V 24 Taas अकोल्यात गेल्या महिन्याभरात दोन महिलांचा मृत्यू झालाय. हा मृत्यू दूषित पाणी पिल्याने झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द गावात स्वतंत्र विहिरीचे दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झालाय, असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी देखील केलाय. या प्रकारामुळे बार्शिटाकळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, निंबी खुर्दवासीयांच्या या आरोपानंतर…