नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज फैसला; उमेदवारी राहणार की जाणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष

Share

V 24 Taas

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या महत्वपुर्ण निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवलं होत. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता.

याप्रकरणी आज अंतिम निकाल येणार असून नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी आजचा निकाल अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. या प्रकरणाच्या निकालाचं वाचन ओपन कोर्टात होणार असून, निकाल वेबसाईटवर अपलोड केला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा आज आपला नामाकंन अर्ज दाखल करणार असून आजच अमरावतीमध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपला अपेक्षितच निकाल येणार की काही नाट्यमय घडामोडी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या रश्मी बर्वेंच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल…

त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल आज येणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 10.30 वाजता निकाल देणार असल्याचं न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी सांगितले आहे.

रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. बुधवारी सुनावणी घेत दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद ऐकून घेत गुरुवारसाठी निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे आज रश्मी बर्वे याना निकालातून दिलासा मिळणार की धक्का बसणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *