V 24 Taas
लवकरच लग्नसराईचा काळ सुरु होईल. अशातच पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती अशातच मार्च महिन्यात मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाने नवा विक्रम केला आहे.
मार्च महिन्यात मागच्या ११ दिवसांपासून सोनं तब्बल ३ हजारांपेक्षा जास्त रुपयांनी महागले आहे. १ मार्चपासून ते ७ मार्चपर्यंत सोन्याच्या भाव ६५ हजार रुपयांवर पोहोचला. अशातच लवकरच सोन्याचा भाव ७० हजारांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२०२३ च्या सुरुवातीपासून ते वर्षाअखेरीस सोन्याच्या भावात १६ टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. २०२४ मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील सोन्याचा आजचा दर
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०५० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात ३९० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६५,९९० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ४२० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,२०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ९०० रुपयांनी घसरण झालीये.
2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
- मुंबई- ६५,८४० रुपये
- पुणे – ६५,८४० रुपये
- नागपूर – ६५,८४० रुपये
- नाशिक – ६५,८७० रुपये
- ठाणे – ६५,८४० रुपये
- अमरावती – ६५,८४० रुपये