V 24 Taas
आनंद खंडेराव V 24 Taas Chip
डॉ. बाबासाहेब आंबेडकराचं नुसतं नाव जरी काढलं तरी, आपल्या डोळ्यांसमोर निळा रंग उभा राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगातील नाते सविस्तर जाणून घेऊ या.
बाबासाहेब आणि बौद्ध धर्मीयांचं निळा रंग हा फार प्रिय रंग समजला जातो. पण निळ्या रंगाचं आणि बाबासाहेबांचं नेमकं नातं काय माहिती आहे का? निळ्या रंगाला क्रांतीचं प्रतिक मानलं जातं. बौद्ध धर्मातही निळ्या रंगाला प्रचंड महत्व आहे. याव्यतिरीक्त बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा रंगही निळा होता.
समता सैनिक दलाच्या टोप्या आजही निळ्याच आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं नेतृत्व आणि निळा झेंडा, असं समीकरण होतं. निळा रंग अथांग महासागर, शांतता, संघर्ष, यांचंही प्रतिक मानला जातो. त्यामुळे आजही त्यांचे अनुयायी निळ्या रंगाला विचारांचं प्रतिक मानतात. ज्ञानाच्या अथांग महासागरला अर्थात बाबासाहेबांना अभिवादन करताना निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करतात.
राज्यात आज मोठ्या उत्साहात भारतीय घटनेचे शिल्पकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी अन् ढोलताशांचा आवाज घुमत आहे. अनेक ठिकाणी रांगोळी आणि विविध कलेच्या माध्यमांतून महामानवाला अभिवादन देखील केलं जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांच्या अनुयायांनी त्यांच्यावर असंख्य गाणे लिहली. कडुबाई खरात यांचं ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर’ हे गाणं बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये चांगलंचप्रिय आहे. तर ‘आहे कुणाचे योगदान, लाल दिव्याच्या गाडीला’ या गाण्याने तरुणाईला वेड लावलं आहे. ‘माया भीमानं सोन्यानं भरली ओटी’ अशी अनेक भीमगितं आजही भीमसैनिकांच्या काळजाचा ठोका चुकवतात.