चीनने दक्षिण समुद्रात उतरवली सर्वात अत्याधुनिक सुपरकॅरियर युद्धनौका; अमेरिकेलाही देणार टक्कर

ShareV 24 Taas चीनने आपली पहिली सुपरकॅरियर युद्धनौका समुद्रात उतरवली आहे. चीनचीही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे, अमेरिकेच्या बाहेर बनवण्यात आलेलीही सर्वात अत्याधुनिक एयरक्राफ्ट कॅरियर आहे. फुजियान असं या युद्धनौकेचं नावं असून चीन च्या फुजियान प्रांतावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. चीनची ही पहिली कॅटोबार एअरक्राफ्ट असून चीनच्या भूमिवरच या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे.