चिखली गौणखनिज प्रकरण, 4.13 कोटींचा दंड : तहसीलदार संतोष काकडे…

Share

V 24 Taas

बुलढाणा जिल्ह्यात गौणखनिज तस्करांना प्रशासनाने चांगेलच वठणीवर आणल्याचे चित्र आहे. या जिल्ह्यातील चिखली तहसीलदार यांनी गौणखनिज तस्करांना तब्बल ४.१३ कोटींचा दंड ठोठावला आहे. दरम्यान अवैधरित्या गौण खनिजाच्या प्रकरणात गय केली जाणार नाही असा इशारा तहसीलदार संतोष काकडे यांनी दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गौैणखनिज तस्करांना चाप लावण्याचे काम तहसीलदार संतोष काकडे यांनी जोरदारपणे सुरू केले आहे. आठवडाभरात त्यांनी अवैधरित्या गौण खनिज उत्खनाच्या वेगवेगळ्या प्रकरणात संबंधितांवर तब्बल ४ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचे दंड ठोठावला आहे. त्यांच्या या कारवाईमुळे अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

चिखली तालुक्यातील मौजे भोकर येथील सरकारी ई क्लास गट नं. १७९ मध्ये प्रशासनाला जवळपास १ हजार ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आले होते, तर सदरचे उत्खनन सुपरवायझर रानुबा सखाराम जाधव यांनी केल्याचे चौकशीत समजले. तर उत्खनन केलेल्या मुरमापैकी अंदाजे ३०० ते ३५० ब्रास मुरूम वाहतूक केल्याचे प्रशासनास निदर्शनास आले होते.

या प्रकरणात एस.आर.एल. कन्स्ट्रक्शन (जालना) यांनी अवैधरित्या ८५० ब्रास मुरूम अवैधरित्या उत्खनन केल्याने त्यांचेवर (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार) एकूण ७५० ब्रास मुरूम करिता प्रतिब्रास रुपये ३ हजार बाजार मूल्याप्रमाणे होणारे एकूण किंमत २५ लाख ५० हजारच्या पाचपट दंड ०१ कोटी २७ लाख ५० हजार अधिक ८५० ब्रास मुरमा करता रॉयल्टी प्रति ब्रास ६०० रुपये प्रमाणे ०५ लाख १० हजार असा एकूण दंड ०१ कोटी ३२ लाख ७ हजार रुपये असा दंड आकारण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *