जिंतूर शहरात भीमजयंती आणि लग्न समारंभ साहित्य खरेदी करणाऱ्या बंधू भगिनींना आवाहन

Share

V 24 Taas

रत्नदीप शेजावळे जिंतूर

जिंतूर :- जिंतूर शहरातील स्वतःला नामांकित कंपनीचे कापड आणि ईलक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचा दावा करणारे दुकानदार जिंतूर तालुक्यातील अशिक्षित अडाणी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन वारेमाप लूट करीत आहेत. 

कपड्यांवर हाताने रबरी स्टँपचे शिक्के मारून ब्रँडच्या नावाखाली पुणे मुंबईच्या तुलनेत जनता मार्केट मध्ये मिळणारा 300₹चा शर्ट 1000₹ ला विकत आहेत, साडी धोतर शर्ट पँट ब्लेझर लग्नाचा बस्ता ज्या कपड्याच्या टिकाऊपणाची कोणतीही गॅरंटी नाही. हजारो रुपयांची कापड खरेदी केल्यानंतर ग्राहकाला GST कर अदा केलेले बील पावती देणे बंधनकारक असताना, शहरातील स्वतःला विश्वस्वनिय दुकान विक्रीचा फलक लावून शहरभर जाहिरात करणारे व्यापारी ग्राहकांचा आणि पर्यायाने शासनाचा कर बुडवून फसवत आहेत.

गाव सोडून परजिल्ह्यात उघड्या शेतात राहून चार महिने गुलाबी थंडीत दिवस रात्र एक करून ऊसतोडी आणि मजुरीतुन कमावलेला जनतेच्या घामाचा एक एक पैसा बडे व्यापारी ब्रँडच्या नावाखाली लुटत आहेत. ईलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकाला GST बील अदा केलेली पावती देणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांनी लक्षात ठेवावं तुमच्याकडे खरेदीसाठी आलेले लोक व्याज व्यवहार आणि कष्ट करून घामाचे पैसे घेऊन येत आहेत. अतिरेक कराल तर कर्माची फळं परत मिळतील.

शहरात ग्राहकांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक मंचाच्या माध्यमातून जिंतूर शहरात बॅनर फ्लेक्स पोस्टर हँडबील भित्तीपत्रक माहितीपत्रक काढून जनजागृती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. 

पाकीटबंद वस्तू खरेदी करताना “एक्सपायरी डेट” बघून वस्तू खरेदी करा

गर्दीचा आणि ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही व्यापारी ब्रँडच्या नावाखाली एक्सपायर झालेली वस्तू गरीब जनतेच्या सर्रास माथी मारत आहेत. वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट बघून वस्तू खरेदी करावी. कमी कालावधीत धुण्याने खराब होणारी विक्री नं झालेली जुनाट गोदामातील कापड ग्राहक पाहून विक्री करीत असल्याचे देखील कळत आहे. सावध राहा.

नागरिकांनी कापड खरेदी केल्यानंतर GST कर अदा केलेली शक्यतो कंप्युटर पावती मागा

बऱ्याच अधिकारक्षेत्रांमध्ये, संगणकाद्वारे तयार केलेले बिल हे योग्य GST बिल मानले जाते जोपर्यंत त्यात कर अधिकाऱ्यांना आवश्यक असलेले सर्व तपशील असतात. या तपशीलांमध्ये सामान्यत: पुरवठादाराचे नाव आणि पत्ता, जीएसटी ओळख क्रमांक, एक अद्वितीय बीजक क्रमांक, जारी करण्याची तारीख, प्राप्तकर्त्याचे नाव आणि पत्ता, पुरवठा केलेल्या वस्तू किंवा सेवांचे वर्णन, प्रमाण, एकूण मूल्य आणि लागू जीएसटी रक्कम इत्यादी बाबी असतात. 

जिंतूर तालुक्यातील जो दुकानदार GST कर अदा केलेली पावती देण्यासाठी नकार देत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा. 9028916036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *