दुपारी अर्ज, संध्याकाळी उमेदवारी; बुलडाण्याची जागा शिवसेनेला कशी मिळाली, संजय गायकवाड यांनी सांगितली इनसाइड स्टोरी…

Share

V 24 Taas

बुलढाणा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय गायकवाड यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे.

बुलढाणा लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित झाली आहे. मात्र काल महायुतीतील शिवसेनेचेच आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह महायुतीत खळबळ उडाली होती. मात्र आज महायुतीच्या भव्य मेळाव्यातून संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

“मी जेव्हा दुपारी अर्ज भरला तेव्हा सायंकाळी यादी जाहीर झाली व उमेदवारी शिवसेनेला मिळाली. मी दुपारी खासदारकीचा नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे, अशी स्पष्टता आमदार संजय गायकवाड यांनी केली. तसेच खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याचे आवाहनही संजय गायकवाड यांनी केले. त्यामुळे त्यांचा नामांकन अर्ज मागे घेतला जाईल हे स्पष्ट झाले आहे.

भाजप आमदारांनी फिरवली पाठ

दरम्यान, आज बुलढाण्यामध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तसेच भाजपाचे काही आमदार उपस्थित होते. मात्र भाजपचे आमदार श्वेता महाले आणि आमदार आकाश फुंडकर यांनी महायुतीच्या या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे बुलढाण्यामध्ये भाजप- शिवसेनेत असलेला अंतर्गत वाद समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *