अकोला लोकसभेच्या जागेचे राजकीय गणित काय?

Share

V 24 Taas न्युज नेटवर्कर

अकोला :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वत: लोकसभेच्या निवडणूकीला उभे राहण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला अकोला आणि सोलापुरात चांगलं मताधिक्य मिळालं होतं. तर येत्या निवडणुकीसाठी आंबेडकरांना मविआची साथ मिळाली तर ते सहज जिंकू शकतात? कसं हे समजून घेण्यासाठी मागच्या निवडणुकीचा आढावा घेऊयात.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वत: लोकसभेच्या निवडणूकीला उभे राहण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला अकोला आणि सोलापुरात चांगलं मताधिक्य मिळालं होतं. तर येत्या निवडणुकीसाठी आंबेडकरांना मविआची साथ मिळाली तर ते सहज जिंकू शकतात? कसं हे समजून घेण्यासाठी मागच्या निवडणुकीचा आढावा घेऊयात.

2019 लोकसभा निवडणूक

भाजप- वंचित- कॉंग्रेस – आणि अकोला

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 2 लाख 78 हजार 848 मतं मिळाली

कॉंग्रेसला 2 लाख 54 हजार 370 आणि तर 5 लाख 54 हजार 444 मितांनी भाजपने विजय मिळवला.

2019 लोकसभा निवडणूक

वंचित- 2 लाख 78 हजार 848

कॉंग्रेस- 2 लाख 54 हजार 370

भाजप-5 लाख 54 हजार 444

वंचितला आणि कॉंग्रेसला मिळालेल्या मतांची बेरीज केली तर 5 लाख 33 हजार 218? हा आकडा येतो. हा आकडा भाजपला मिळालेल्या आकड्याच्या खूप जवळपास आहे. त्यामुळेच अकोला लोकसभेची जागा गेमचेंजर ठरू शकते.

2014 नंतर 2019 झालेल्या निवडणुकीत वंचितला 10 टक्यांनी मतदान वाढलं होतं. त्यामुळे मविआ आणि वंचित एकत्र आल्यास भाजपला अकोल्यातून टफ फाईट मिळू शकते.

वंचितने अकोल्यातून माघार घेतली तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी टफ फाईट होऊन महाविकास आघाडी ही जागा सहज जिंकू शकते. 2004, 2009, 2014 आणि 2019 ला भाजप सलग अकोला लोकसभेच्या जागेवर गुलाल उधळत आहे. भाजपचे संजय धोत्रे हे चार वेळा भाजपच्या जागेवर विजयी झाले आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती खराब आहे. यामुळे संजय धोत्रे यांच्या जागी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे हे निवडणूक लढवू शकतात.

तसंच माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. सध्या तरी भाजप दुसऱ्या उमदेवाराच्या शोधात आहे. मविआ आणि वचितचं जुळलं तर अकोल्यात भाजपच काय होणार? आणि वंचित खरंच अकोल्याची जागा सोडेल का पाहणं म्हत्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *