V 24 Taas न्युज नेटवर्कर
गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणातून खूनासारख्या भयानक घटना घडत आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबंधातून घडत असल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना तेलंगणातील जगितियाल जिल्ह्यात घडली आहे. लहान बहिणीने मोठ्या बहिणीसोबत असं काही कृत्य केलंय, जे पाहून पोलिसही चक्रावून गेलेत.
नेमकं काय घडलं?
२८ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांना हैदराबाद येथील एका इमारतीत दीप्ती या तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. दीप्ती एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. प्राथामिक तपासानंतर तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आला.
याप्रकरणी दीप्तीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दीप्तीची हत्या नेमकी कुणी केली असावी, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. तब्बल ५ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना दीप्तीचे मारेकरी शोधण्यात यश मिळालं. दीप्तीची हत्या तिच्या लहान बहिणीनेच केल्याचं पोलीस तपासात उघड झालं.
पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपणच प्रियकराच्या मदतीने दीप्तीची हत्या केल्याची कबूली चंदाने दिली. वास्ताविक चंदाचे सुलतान नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचीही जात वेगळी असल्याने दीप्तीचा त्यांच्या नात्याला विरोध होता.
सुलतानपासून दूर राहा, नाहीतर आई-बाबांना सर्व प्रकरण सांगेल, अशी धमकी दीप्तीने चंदाला दिली होती. यावरून चंदाला राग अनावर झाला. तिने २७ ऑगस्ट रोजी हैदराबाद मध्यरात्रीच हैदराबाद गाठले. दीप्तीच्या घरी गेल्यानंतर दोघांनी मिळून दारू पार्टी केली.
दीप्ती दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेऊन चंदाने प्रियकर सुलतानला प्लॅटवर बोलावलं. नंतर दोघांनीही मिळून उशीने तोंड दाबून दीप्तीची हत्या केली. हत्येनंतर दोघेही फरार झाले. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पोलिसांना दीप्तीचा मृतदेह आढळून आला तेव्हा चंदा वडिलांसमोरच धाय मोकळून रडत होती. यामुळे कुणालाही तिचा संशय आला नाही.