V 24 Taas न्युज नेटवर्कर
अकोला :- प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यात आज महाविकास आघाडीचा जिल्हा मेळावा झाला. या मेळाव्यात अकोल्याची जागा आघाडीतील कोणत्या पक्षाकडे जाणार याचा निकाल लागलाय. महाविकास आघाडीतील नेते कोणत्या उमेदवारासाठी प्रचार करतील आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहतील यांची माहिती ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिलीय.अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनमध्ये महाविकास आघाडीच्या तीन पक्षांचा मेळावा झाला. मात्र या मेळाव्याचं वंचितला निमंत्रण नव्हतंय. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांसह तिन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मेळाव्याला उपस्थिती होती. दरम्यान अकोला जागेचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केलीये. महाविकास आघाडीत वंचित आल्यास तिन्ही पक्ष अकोल्यातून आंबेडकरांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार असल्याचं आमदार नितीन देशमुख म्हणालेत.
जर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर आपण त्यांना पूर्णपणे मदत करू असं देशमूख म्हणालेत. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांची जागा वाटपासंदर्भात ७ तारखेला बैठक झाली. यात काहीशी चर्चा झाली, त्यानंतर पुढील बैठक ९ तारखेला होणार आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत जागावाटपासंदर्भात वाटाघाटीवर चर्चा होईल.मात्र महाविकास आघाडीच्या जिल्हा मेळाव्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं वेगळं पण दिसून आलं. उद्या जर वंचित आपल्यासोबत नसली तर काय होईल? २०१९ चा निवडणूक निकाल पाहता भविष्यात अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित आणि मविआ’ची लढत होईल. या लढतीत भाजपसुद्धा राहू शकणार नाहीये, असे देशमुखांनी तिन्ही घटक पक्षाचे उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं एकंदरीतचं आता महाविकास आघाडी वंचितच्या विरोधात उभे राहत रणशिंग फुंकेल की अजून काही. हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.