निलंबित पोलिसासह व्हिडिओ बनवून व्हायरल करय्रावरही गुन्हा दाखल…

Share

24 Taas न्यूज नेटवर्क

संग्रामपूर:- यूवकाला अमानूष मारहाणीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गून्हा दाखल करण्यात आला. दि. १ ला संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा येथे कार्यरत नंदकिशोर तिवारी या पोलीस कर्मचाऱ्याने येथीलच ऑटो चालक शेख मतीन शेख मोबिन या ३० वर्षीय यूवकाला अश्लील शिविगाळ करून अमानूष मारहाण केली होती. दि. २ ला पोलिसाकडून युवकाला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पोलीस कर्मचारी नंदकिशोर तिवारी याचे तातडीने निलंबन करण्यात आले. दरम्यान पातुर्डा येथील शेख मतिन शेख मोबिन या यूवकाला दि. १ ला त्याच्या विरुध्द दाखल गुन्हयात प्रतिबंधक कार्यवाही साठी तामगाव पोलीस ठाण्यात बोलावले. पो.हे.काॅ नंदकिशोर तिवारी या पोलीस कर्मचाऱ्याने सदर यूवकाला ठाण्यातील बाजूला असलेल्या हॉलमध्ये नेवून तळहात पायावर बाजीराव पट्ट्याने मारहान करीत गालावर चापटा मारून अश्लिल शिवीगाळ केली. तसेच संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोलद येथील शेखर पुंजाजी नृपनारायण याच्या सांगण्यावरून पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा त्या युवकाला गालावर दोन चापटा मारल्या. युवकाला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहान होत असतांना शेखर नृपनारायण याने त्याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर व्हायरल केला असल्याचे फिर्यादीत नमुद आहे. याप्रकरणी शेख मतीन याच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात निलंबित पोलीस कर्मचारी नंदकिशोर लक्ष्मीनारायण तिवारी तसेच काटेल येथील शेखर पुंजाजी नृपनारायण या दोघांवर कलम ३२४, २९४,१०९, ५०४, ३४ भादविनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *