V 24 Taas
महाराष्ट्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. यावेळी मध्यप्रदेश सरकारच्या पावलांवर पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने देखील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहिण योजना म्हणून या योजनेचे नाव असून महाराष्ट्र राज्यातील तब्बल 90 ते 95 लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. चला तर मग अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया महराष्ट्र सरकारच्या या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणाऱ्या योजनेबद्दल.
योजनेचा उद्देश
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या महिलांना कोणाचाही आधार नाही किंवा कोणतेही कायमस्वरुपी रोजगाराचे संसाधन नाही अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. दारिद्र्य रेषेखालील महिला आणि विधवा, परितक्त्या व घटस्फोटित महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
मध्य प्रदेशातील लाडली बहन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना
भारतात सर्वप्रथम मध्य प्रदेश सरकारमार्फत लाडली बहेन योजना राबविण्यात आली. आज मध्यप्रदेश राज्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या 45 लाखाहून जास्त महिला असून त्या सरकारच्या या योजनेमुळे अत्यंत समाधानी आहेत. मध्यप्रदेश सरकारने घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाला प्रेरीत होऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक महिलांना 1200 ते 1500रुपये महिना दिले जाणार आहेत.
महिलांना दर महिना किती रुपये मिळणार?
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी ठरणार आहेत त्यांना राज्य सरकार दर महिना 1200 ते 1500 रुपये देणार आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर 20 ते 25 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे परंतु महाराष्ट्र सरकार महिलांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेच्या निर्णयावर ठाम असून दारिद्र्य रेषेखालील अनेक महिलांना या योजनेला लाभ देण्यात येणार आहे.
महिला लाभार्थी होण्यासाठी पात्रता
महिला महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी.
महिलेचे वय 21 वर्षे ते 60 वर्षे दरम्याने असावे.
महिलेचे वार्षिक उत्पन्न 60 हजार पेक्षा कमी असावे.
महिलेकडे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड असावे.
विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
लाडकी बहिण ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड
दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड
बँक खात्याचा तपशील
रहिवाशी दाखला
जन्म दाखला
दोन पासपोर्ट साईज फोटो
योजने अंतर्गत किती महिला लाभार्थी असू शकतील.
लाडकी बहिण या योजने अंतर्गत गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील तब्बल 90 ते 95 लाख महिलांना या योजनेत सामावून घेतले जाणार आहे.
याआधी महाराष्ट्र सकारच्या महिलांसाठीच्या योजना
माझी कन्या भाग्याश्री योजना
लेक लाडकी योजना
महिला उद्योगिनी योजना
सुकन्या समृद्धी योजना
जननी सुरक्षा योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
महिला समृद्धी कर्ज योजना
विधवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारच्या योजना
इंदिरा गांधी पेन्शन योजना
विधवा पेन्शन योजना
पंतप्रधान शिलाई मशीन योजना
स्वाधार गृह योजना
योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
महाराष्ट्र सरकार लवकरच लाडकी बहिण योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरु करणार आहे, या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ReplyForwardAdd reaction |