V 24 Taas
संग्रामपूर:- अंबाबरवा अभयारण्यात आलेल्या पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान पट्टेदार वाघाचे दर्शन घडत आहे. रविवारी दोन वेगवेगळ्या जंगल सफारी दरम्यान विविध ठिकाणच्या पर्यटकांना वाघोबा दिसून आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गत आठवड्यात १० मे ला दुपारच्या जंगल सफारी दरम्यान जळगाव जा येथील तीन पर्यटकांना अभयारण्यात वाघ दिसून आला होता. पून्हा ९ दिवसांनी रविवारी एकाच दिवशी दोन वेळा विविध ठिकाणी वाघोबाचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साह दिसून आला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सामाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात रविवारी सकाळच्या जंगल सफारी दरम्यान बूलढाणा येथील पर्यटकांना एका वाघाने दर्शन दिले. तर पुन्हा दुपारच्या जंगल सफारी दरम्यान दरम्यान सोनाळा येथील पर्यटकांना पट्टेदार वाघ दिसून आला आहे. दोन्हीही वेगवेगळ्या जंगल सफारी वेळी अभयारण्यात विविध ठिकाणी पट्टेदार वाघ निवांत पणे बसलेला दिसून आला आहे.
येथे पर्यटकांना वाघोबा सह ईतर विविध वन्य प्राणी दिसून येत असल्याने हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे अंबाबरवा अभयारण्याची श्रीमंती वाढली आहे. सकाळच्या जंगल सफारी वेळी पर्यटकांसोबत मार्गदर्शक दिलिप मूझाल्दा, वाहन चालक निलेश धांडेकर तर दुपारच्या जंगल सफारी दरम्यान पर्यटकांसोबत मार्गदर्शक अशोक पालकर, वाहन चालक निलेश धांडेकर उपस्थित होते.
दोन वेगवेगळ्या जंगल सफारी दरम्यान बूलढाणा व सोनाळा येथील पर्यटकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. रविवारी सकाळ व दुपारच्या जंगल सफारी दरम्यान अभयारण्यात विविध ठिकाणी पर्यटकांना वाघ दिसून आला आहे.
सुनील वाकोडे वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)
सोनाळा ता. संग्रामपूर