V 24 Taas
नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव येणाऱ्या सिमेंट बलगरवरील चालकाचं नियंत्रण सुटून दुचाकीला धडक दिली आणि पेट घेतला. यात केबीनमध्ये अडकल्यामुळे चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र, कसारा पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम व मुंबई नाशिक एक्सप्रेस वे च्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. तर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवून बलगर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.