V24 Taas न्यूज नेटवर्क
संग्रामपूर:- गाव, परिसर आणि पोलिस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे, लोकांच्या समस्या सोडविणे आणि अन्याय झालेल्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे ही कामे प्रामुख्याने पोलिसांची आहेत. मात्र, तामगाव पोलिस स्टेशनचाच कारभार सद्यस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे तामगाव पोलिस स्टेशन आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. पोलीसाकडून एका यूवकाला बेदम मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायलर झाला आहे. या व्हिडिओ मुळे संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील पातुर्डा येथील एका यूवकाला येथील तिवारी नामक पोलीस कर्मचारी अश्लील शिविगाळ करून मारहाण करीत असल्याचे त्या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे. पोलिसाकडून यूवकाला अमानूष मारहाण करण्याचे कारण अजून समजले नाही. दरम्यान ज्यांनी वाद सोडवायचे, लोकांना न्याय द्यायचा, तेच पोलीस सर्व सामान्य नागरिकांवर बळाचा वापर करीत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राजेंद्र पवार ठाणेदार पोलीस स्टेशन तामगांव.
समाज माध्यमांवर व्हायलर व्हिडिओ च्या अनुषंगाने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे.