प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

Share

V 24 Taas

नवी मुंबईमध्ये एका २७ वर्षीय महिलेचा  मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायरव्हरला अटक केली आहे. लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याच्या वादातून या महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

रविवारी नवी मुंबई पोलिसांनी सांगिकलं की, त्यांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना २५ एप्रिल रोजी सकाळी एका २७ वर्षीय महिलेचा मृतदेह नवी मुंबईतील उरण भागातील चिरनेर-खारपाडा येथे तळेखार येथे कोरड्या नाल्यात आढळला होता. तो मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना १८ एप्रिल रोजी मुंबईतील मानखुर्द पोलीस ठाण्यातून एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतरच्या पडताळणीत उरणमध्ये सापडलेला मृतदेह हा ‘त्या’ बेपत्ता महिलेचाच असल्याचं स्पष्ट झालं. अधिक चौकशीत असं दिसून आलं की, महिलेचे मुमपुरातील नागपाडा येथील टॅक्सी चालकाशी प्रेमसंबंध होते. ही महिला सारखी आरोपीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे कंटाळून आरोपीने टोकाचं पाऊल उचललं होतं.

१८ एप्रिल रोजी आरोपीने मृत महिलेला ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील खडवली येथे नेले. त्याने १९ एप्रिल रोजी पहाटे एकच्या सुमारास त्या महिलेची हत्या केली. तिचा मृतदेह नाल्यात टाकला. आरोपीला अटक करण्यात आली आणि कोर्टासमोर जबाब सादर करण्यात आला. त्यांनी त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमाचा भयानक शेवट झाल्याचं या प्रकरणात पाहायला मिळालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *