V 24 Taas
बदलेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा आजार ही एक मोठी समस्या बनली आहे. यामध्ये तरुणांपासून वयोवृद्ध देखील बळी पडले आहेत. मधुमेहाचा हा आजार शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाल्यावर होतो.
सध्या जगभरात मधुमेहाचे रुग्ण सतत वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात औषधांपेक्षा आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. बरेचदा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. ज्यामुळे आपण घाबरतो. अशावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच काही घरगुती उपायांनी देखील शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवता येते.
1. पाणी प्या
रक्तातील साखर झापाट्याने वाढत असेल तर जास्त पाणी प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजपासून मुक्त होण्यास मदत होईल. जे साखर नियंत्रित होण्यास मदत करेल. शरीरात हायड्रेशनची पातळी वाढवून साखरेची पातळी नियंत्रणात आणू शकतो.
2. व्यायाम करा
रक्तातील साखरेची पातळी लवकर कमी करण्यासाठी व्यायाम करणे हा चांगला मार्ग आहे. या काळात अतिरिक्त ग्लुकोजचा योग्य वापर केला जातो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
3. फायबर
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासही खूप मदत होते. यामुळे चयापचय वाढते आणि साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
4. आहार
शरीरातील साखर वाढल्यावर कारल्याचा किंवा जांभळाचा रस पिणे फायदेशीर ठरु शकते. यामुळे इन्सुलिन नियंत्रणात येण्यास मदत होते. यात असणारे घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा