V 24 Taas
संग्रामपूर :- सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असून लग्न वरात मिरवणुकी दरम्यान सर्रासपणे विनापरवाना डी.जे. वाजवल्या जात आहे. तसेच लग्न वरात मिरवणूक काढत असतांना संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबून मोठ्या आवाजात डी.जे. वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाचविल्या जात आहे. त्यामुळे दोन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
पोलीस स्टेशन तामगांव हद्दीतील ग्राम पातुर्डा येथे सुध्दा दि. 20/04/2024 रोजी लग्न मिरवणुकी दरम्यान मस्जिदीसमोर डी.जे. वर आक्षेपार्ह गाणे वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच काल दिनांक 27/04 /2024 रोजी रात्रीच्या दरम्यान पोलीस स्टेशन सोनाळा हद्दीतील ग्राम टुनकी झालेल्या वरात मिरवणूकी दरम्यान संवेदनशील ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्याने दोन गटात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
डी.जे. या वाद्याच्या आवाजामुळे नवजात शिशु तसेच वयोवृद्ध लोकांच्या कानावर व हृदयावर वाईट परिणाम पडत आहे. पोलीस स्टेशन तामगांव हद्दीतील गावामध्ये ज्या ठिकाणी लग्न समारंभ आहेत त्याठिकाणी लग्न व वरात मिरवणूक काढल्या जात आहे तसेच मिरवणुकीमध्ये डी.जे. व वाद्य वाजवीत आहेत काय यावर तामगांव पोलीसांनी आपली गोपनीय यंत्रणा सक्रिय करून त्यावर लक्ष ठेवून आहेत.
यापुढे पोलीस स्टेशन तामगांव हद्दीतील कुठल्याही गावांमध्ये लग्न वरात व इतर मिरवणुकी दरम्यान डी.जे. हे वाद्य पोलिसांची पूर्व परवानगी न घेता त्यांच्यावर आक्षेपार्ह गाणे वाजून दोन धर्मामध्ये वाद होऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास डी.जे. वाद्य पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक अशी कठोर कारवाई करण्यात येणार. तसेच लग्न वरात मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादाबाबत एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील,
असे आवाहन तामगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी जनतेला केले आहे.