V 24 Taas
चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहाते ते डोळ्यांमुळे. डोळे सुंदर दिसण्यासाठी आपण त्यावर अनेक गोष्टी लावण्याचा प्रयत्न करतो. अगदी लहानपणापासून डोळे सुंदर दिसावे यासाठी आई-आज्जी आपल्याला डोळ्यांना काजळ लावत असते. ज्यामुळे डोळे छान आणि टपोरे दिसतात.
हल्ली काजळचे नवीन ब्रॅण्ड आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. महिलांच्या पर्समध्ये काजळ सहज आपल्याला मिळते. परंतु, अनेकदा काजळ लावल्यानंतर ते डोळ्यांखाली पसरते ज्यामुळे डोळ्यांचा खालचा भाग काळा दिसू लागतो. पसरलेले काजळ नीट कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. काजळ कसे लावायचे, ते पसरल्यानंतर डोळ्यांची काळजी कशी घ्यायची जाणून घेऊया.
1. डोळ्यांखाली पसरलेले काजळ काढण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करु शकता. हे त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. याशिवाय खोबऱ्याचे तेलही फायदेशीर आहे. कापसाचा गोळा आणि तेलाच्या सहाय्याने तुम्ही डोळ्यांखाली पसरलेले काजळ काढू शकता.
2. बेबी ऑइलच्या मदतीनेही काजळ काढता येते. यासाठी तुम्हाला कापसाचा गोळा बेबी ऑइलमध्ये टाकून हलक्या हाताने डोळ्यांभोवती पसरवून काढून टाका. मेकअप रिमूव्हर काजळ काढून टाकण्यास मदत करते.
3. काजळ काढताना डोळे अजिबात चोळू नका. यामुळे डोळ्यांवर सूज येऊ शकते. आपले डोळे अतिसंवेदनशील असतात. त्यामुळे या गोष्टी आधी हातावर वापरुन मग डोळ्यांवर वापरा.
4. मेकअप रिमूव्हर वापरण्यापूर्वी त्याची तारीख तपासा. काही महिलांना या गोष्टींची ऍलर्जी असू शकते. त्यासाठी चांगल्या ब्रॅण्डचे मेकअप रिमूव्हर वापरा.