शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य…

Share

V 24 Taas

मेष: दुसऱ्याच्या कामात दोष शोधू नका.

आजचा दिवस तुमच्या कुटुंबात काही समस्या घेऊन येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या काही चुका होऊ शकतात. दुसऱ्याच्या कामात दोष शोधू नका.

वृषभ: दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार.

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. साथीदाराच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती दिसेल. मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

मिथुन: काही चांगली बातमी कळू शकते.

आज तुमच्या कला कौशल्यात सुधारणा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी कळू शकते. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपासून सावध राहा, अन्यथा तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. आईच्या तब्येतीबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे.

कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी खास.

आजचा दिवस तुमच्यासाठी काही खास करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी कोणालाही भागीदार बनवणे टाळा. घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. सासरच्या कोणाशीही व्यवहार करू नका. काही कामामुळे तुम्हाला बाहेरगावी जावे लागू शकते.

सिंह: लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळेल. कोणालाही न विचारता सल्ला देणे टाळावे. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. खूप दिवसांनी जुन्या मित्राची भेट होईल.

कन्या: वादविवादापासून तुम्ही दूर राहा.

आज राशीच्या लोकांसाठी अडचणीचा दिवस. अचानक बिघडल्याने तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो. खर्च वाढल्याने खिशाला झळ बसू शकते. वाहने चालवताना काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही वादविवादापासून तुम्ही दूर राहा.

तूळ: तुमची महत्वाची कामे बिघडू शकतात.

आजचा दिवस तुमच्यासाठी तणावपूर्ण असणार आहे. तुमची महत्वाची कामे बिघडू शकतात. बाहेरच्या व्यक्तीबद्दल काहीही बोलू नका, अन्यथा कोर्टात केस होऊ शकते. तुम्हाला सरकारी योजनेचा पूर्ण लाभ मिळेल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक: कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.

आज आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात. तुमचा एक मित्र मदतीसाठी पुढे येईल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी भाग्याचा दिवस. लोकांची सहानुभूती मिळू शकते. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.

धनु: तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.

आजचा दिवस तुमच्यासाठी संकटाचा असणार आहे. कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला काही नुकसान होऊ शकते. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सावध राहा. तुमची आज मोठी फसवणूक होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचले जाऊ शकतात.

मकर: वाहने वापरताना सावधगिरी बाळगा.

आजचा दिवस तुमच्यासाठी शांततापूर्ण असणार. व्यवसायात मोठा निर्णय घेऊ शकता. वाहने वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो. कामाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या.

कुंभ: एखादी भाग्यकारक घटना घडेल.

आज तुम्ही कोणतेही काम काळजीपूर्वक विचार करूनच कराल. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुमचे एखादे काम अडले असेल, तर लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला आजूबाजूच्या लोकांशी संपर्क ठेवावा लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन: विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळेल.

आज कामात तुमचे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. तब्येत बिघडल्यामुळे जास्त पैसे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *