उत्तरपत्रिकेत ‘जय श्रीराम’ लिहिलं, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी पास; नेमका घोळ कसा झाला उघड?

Share

V 24 Taas

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील पूर्वांचल विश्वविद्यालयातून अजब प्रकरण समोर आलं आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्याने परीक्षेतील एका पेपरमध्ये उत्तराच्या जागी ‘जय श्रीराम’ लिहिलं. तसेच क्रिकेटपटूंची नावे लिहिली. तरीही हा विद्यार्थी या पेपरमध्ये ५६ टक्के गुण मिळवून पास झाला.

माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही बाब समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण थेट राजभवनापर्यंत पोहोचले. या घटनेनंतर राजभवनात ८० उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यात अनेक जणांना अधिक गुण दिल्याचे समोर आले आहे.

या उत्तरपत्रिकांचं पुन्हा मूल्यांकन करण्यात आलं, त्यावेळी बाहेरील परीक्षकांनी जास्तीचे गुण दिल्याचे समोर आले. या प्रकरणी चौकशी समितीने उत्तरपत्रिका तपासणारे दोन शिक्षकांना गुणांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोषी मानत त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे.

या विद्यालयात ३ ऑगस्ट २०२३ रोजी एका विद्यार्थ्याने डी-फार्माच्या पहिल्या सेमेस्टरची परीक्षा झाल्यानंतर १८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. तसेच माहिती अधिकारातंर्गत उत्तरपत्रिकेची मागणी केली होती. त्यानंतर या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या. या परीक्षेत एका विद्यार्थ्याने एका प्रश्नांची उत्तर लिहिताना ‘जय श्रीराम’ लिहिलं. तरीही हा विद्यार्थी पास झाला. तसेच उत्तरामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आदी खेळाडूंची नावे लिहिले होते, हे उघड झाले.

उत्तरपत्रिकेत पश्नांची उत्तर लिहिताना जय श्रीराम आणि क्रिकेट खेळाडू लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी ७५ गुणांच्या पेपरमध्ये ४२ गुण दिले. एकंदरित त्याला या पेपरला एकूण ५६ टक्के गुण दिले. तर काही इतर विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे उत्तीर्ण केल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *