बागायती क्षेत्र वगळल्याने शेतकऱ्यांचे गावातच बेमुदत उपोषण; पीकविमा मिळण्यासाठी मागणी….

Share

V 24 Taas न्युज नेटवर्कर

बुलढाणा : पिक विम्याची माहिती भरताना नुकसान झालेल्या बागायतीचे नुकसान माहिती द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती नसल्याने स्टँडिंग क्रॉफ्ट ऐवजी हार्वेस्टिंग क्रॉफ्ट अशी माहिती भरण्यात आल्याने शेतकरी वंचित राहिले; यामुळे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले आहेत. हा पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी गावातच बेमुदत उपोषण सुरु केले आहे.मागील वर्षी नोहेंबरमध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गाव व परिसरात प्रचंड गारपीट झाली होती. मागील दोन दिवसात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. नोहेंवरमध्ये झालेल्या गारपीटमुळे फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झाले होते. यात पिक विमा काढला होता त्या पिक विम्याची माहिती भरताना नुकसान झालेल्या बागायतीचे नुकसान माहिती द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती नसल्याने स्टँडिंग क्रॉफ्ट ऐवजी हार्वेस्टिंग क्रॉफ्ट अशी माहिती भरण्यात आल्याने शेतकरी वंचित राहिले. ती दूरस्ती व्हावी यासाठी आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.

उपोषणाचा चौथा दिवस

अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे पळसखेड चक्का या गावातील शेतकऱ्यांनी गावातच आमरण उपोषण सुरु केले आहे पिक विमा मिळावा यामागणीसाठी शेतकरी बेमुदत उपोषण करीत असून आज चौथा दिवस आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठलीही या उपोषणाची दखल घेतली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *