नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडलं; तरुण पोलिसांच्या ताब्यात..

Share

V 24 Taas

नांदेड : देशासहित राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे. कडक उन्हातही शेकडो लोक मतदान केंद्रात पोहोचून मतदानाचा अधिकार बजावत आहे. या मतदानादरम्यान राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आता नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली.

नांदेडमधील तरुणाने ईव्हीएम मशीन फोडलं. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली. या तरुणाने छोट्या कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले. भय्यासाहेब एडके असे तरुणाचे नाव आहे. यानंतर मतदान केंद्रावरील पोलिसांनी या तरुणाला तातडीने ताब्यात घेतले. या तरुणाने असे कृत्य का केले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हिंगोलीमध्ये दिव्यांग मतदारांना पिकप अँड ड्रॉप सुविधा

लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, हिंगोली पालिका प्रशासनाने दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची उभारणी केली होती. यासाठी दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरून थेट मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाच वाहनांची सोय करत पिकप अँड ड्रॉप फॅसिलिटी उपक्रम राबवला आहे. पालिकेच्या या उपक्रमाचा दिव्यांग मतदारांना मोठा फायदा झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

जेवणासाठी मतदान प्रक्रिया ठेवण्यात आली बंद

जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मतदार वेळातू वेळ काढून मतदान केंद्रांवर दाखल होत असतात. यवतमाळच्या हिवरी येथील मतदान केंद्रावर चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र बंद ठेवून पंगतीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान प्रक्रिया बंद ठेवता येत नाही, तरी देखील हिवरी येथील मतदान बूथवरील कर्मचाऱ्यांनी सर्व नियम ढाब्यावर ठेवून मतदान प्रक्रिया बंद ठेवून जेवण केल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *