महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात; बुलढाण्यात आज महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने…

Share

V 24 Taas

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत.

29 तारखेला मोदींची दुपारी 3 वाजता लातूर तर सायंकाळी 6 वाजता पुण्यात सभा आहे.तर तीस तारखेला सकाळी 11 वाजता सोलापूर आणि दुपारी 1 वाजता सातारा आणि सायंकाळी 4 वाजता माढा लोकसभा मतदारसघांत मोदी सभा घेणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा होणार आहेत. आज जिल्ह्यात महायुतीचे जेपी नड्डा आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मुकुल वासनिक यांच्या प्रचार सभा होणार आहेत. महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत रंगणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रचार सभा पार पडणार आहे. ही सभा आदिवासी भागातील वरवंत बकाल येथे आयोजित केली आहे. त्यांची प्रचार सभा सकाळी 10 वाजता होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूका २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहेत. आज जेपी नड्डा बुलढाणा दौऱ्यावर आहेत.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे,शरद पवार आणि मुकुल वासनिक यांची प्रचार सभा होत आहे. ही सभा खामगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा पार पडणार आहे. जिल्ह्यात अगोदरच चाळीशी पार झाला आहे. या कडक तापमानात लोकांची गर्दी कोणत्या सभेला जास्त होणार? जेपी नड्डा काय बोलणार ? तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार हे काय बोलणार? याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *