V 24 Taas
अकोला : अकोला जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आजोबानं १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवलं. चुलत आजोबाने नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुलीच्या वयाच्या साडे १७ वर्षांपासून चुलत आजोबाकडून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता. या पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका तरुणांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी गरोदर राहिली. सद्यस्थितीत पीडित मुलीचे वय १८ असून ती ९ महिन्याची गरोदर आहे. या प्रकरणी खदान पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे तिच्या ५० वर्षीय आजोबाने आंघोळ करतानाचे फोटो काढले. त्यानंतर या आजोबाने कारमध्ये नेत ब्लॅकमेल करून फोटो व्हायरल करण्याची धमक दिली. त्यानंतर या आरोपीने पीडित मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या आजोबाने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.
शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेनेही तिला ब्लॅकमेल केलं. या महिलेने एका २३ वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडलं. या शहरातील मलकापूर आणि इतर ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाला. हा धक्कादायक प्रकार दीड वर्ष सुरु होता. मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबीयांना घटना समजली. या घटनेनंतर कुटुंबीय भयभयीत झाले.
दीड वर्षांपासून आरोपी आजोबा आणि महिलेकडून अत्याचार करण्यासाठी दबाव होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी आरोपींवर बाल संरक्षण कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून चुलत आजोबा, २३ वर्षीय तरुणाचा तपास सुरु आहे. तर ब्लॅकमेल करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
पीडित मुलगा ९ महिन्यांची गरोदर
आजोबा आणि नात म्हणजे यांचे नाते आपुलकीचे असते. अकोल्यात ह्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी ९ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या मुलगी १८ वर्षांची असून ९ महिन्यांची गरोदर आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
‘त्या’ महिलेकडून दबाव आणि धमकी
पीडित मुलीला सातत्याने बदनामीची धमकी देण्यात येत होती. दोन महिन्यानंतर पीडित मुलीची मोठी बहीण घरी आली, त्यानंतर तिने हा प्रकार बहिणीला सांगितला. बदनामीच्या भीतीमुळे आई-वडिलांनी मुलीला बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले होते. मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबीयांना तक्रार न करण्यासाठी जीवे मारणे आणि बदनामीची धमकी दिली जात होती.