V24 Taas न्यूज नेटवर्क संग्रामपूर:- एका युवकाने सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. हि धटना संग्रामपूर शहरात बूधवारी सकाळी ११:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. संग्रामपूर शहरातील प्रशांत अरुण बोरोकार या ३५ वर्षीय युवकाने घराच्या जिण्याच्या पोर्चमध्ये स्लॅपच्या हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी धिरज बोरोकार यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. यूवकाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून यासंदर्भात पूढील तपास तामगाव पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे करीत आहेत.