V24 Taas न्युज नेटवर्क संग्रामपूर:- ग्राम पंचायतीच्या अतिक्रमण जागेच्या वादाच्या कारणातून एकाची हत्या करण्यात आली आहे. हि धटना ग्राम कोलद शिवारात २६ रोजीच्या रात्री धडली असून दि. २७ ला सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरुद्ध खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोलद येथील गजानन मोतिराम देऊळकार या ५९ वर्षीय इसमाला माळेगाव रस्त्यालगत एका शेतात लाकडी काठ्यांनी व लाथा- बुक्यानी मारहाण करून त्याचा खुन करण्यात आला. मुतक रात्री शेतातून घरी येत असतांना कोलद येथीलच तिघांनी ग्राम पंचायतीच्या अतिक्रमण जागेच्या वादाच्या कारणातून काठ्यांनी व लाथा- बुक्यानी मारहाण करून खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यासंदर्भात प्रल्हाद देऊळकार यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नितीन महादेव ठाकरे (देशमुख), अमोल ब्रम्हदेव म्हसाळ, ज्ञानेश्वर भास्कर काळे या तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ३०२,३४ भादवि नूसार गून्हा करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना तामगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी घटनास्थळावर मंगळवारी दूपारी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच धटना स्थळी खामगाव येथील प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास तामगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार राजेंद्र पवार करीत आहेत.