V 24 Taas
नात्यात फक्त प्रेम नाही तर तितकाच समजूतदारपणा देखील असायला हवा. प्रत्येक नात्यात चढ-उतारपणा येतो. अनेकदा काही कारणांमुळे नात्यात वाद होतात. परंतु, या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या बनत जातात.
रोजच्या भांडणांनी कंटाळा येतो. अशावेळी आपण नाते संपवण्याचा विचार करतो. जोडीदारापैकी एकजण पुन्हा आपल्याकडे संधी मागतो परंतु, अशावेळी नेमके काय करावे हे आपल्याला सुचत नाही. जर तुमचा पार्टनर देखील सतत भांडण करत असेल आणि ब्रेकअपविषयी बोलत असेल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा.
1. नात्याला संधी देऊ शकता का?
सगळ्यात आधी हे जाणून घ्या की, तुमच्या नात्यात सुधारणा होण्यासाठी खरेच वाव आहे का? प्रत्येक नात्यात संघर्ष करावा लागतो. त्यासाठी एकमेकांना थोड वेळ द्या. आपल्या नात्याला पुन्हा संधी द्यावी का याचा विचार करा.
2. स्वत:ला समजून घ्या
आपल्यासाठी काय चांगले काय वाईट हे आपल्याशिवाय चांगले कुणीही समजू शकत नाही. नातं तुटताना ते वाचवण्यासाठी स्वत:शी बोला. तसेच नात्यात राहणे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे याचा विचारही करा.
3. संवाद महत्त्वाचा
जर तुमच्या नात्यात दूरावा आला असेल तर एकमेकांशी संवाद साधा. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकमेकांना विचारा. समस्येवर मनमोकळेपणाने बोला. जोडीदाराची कोणती समस्या आहे किंवा त्याला तुमच्याकडून काय हवे आहे हे विचारा.
4. प्रयत्न
अनेक छोट्या छोट्या चुकांमुळे नात्यावर परिणाम होतो. त्यासाठी जोडीदाराच्या इच्छेचा मान राखा. नाते वाचवण्यासाठी प्रयत्न करा. आपला पार्टनर खुश कसा राहिल यावर लक्ष द्या.
5. सकारात्मक गोष्टी
नाती कमकुवत होण्याचे एकमेव कारण म्हणजे नकारात्मकता. आपण चुकलो आहोत ही गोष्टी कधीही न स्वीकारणे. त्याचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करा. ज्यामुळे नात्यातील दूरावा कमी होईल.