V 24 Taas
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. यामुळे आंबा, निंबू आणि भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. आज (मंगळवार, ता. 9) अकाेल जिल्ह्यातील मळसुर येथे सलग अर्धा तास वादळी वा-यासह गारपीट आणि पाऊस झाला.
या पावसामुळे आंबा, नींबू आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे नागरीकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान अकोला शहरात देखील वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे.