V 24 Taas
हिंदु समाजाचे जागरण होणे नितांत गरजेचे आहे आता निष्क्रियता सोडून हिंदु युवक युवतींनी देव देश धर्म कार्या करिता समर्पित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन निमगांव तालुका नांदुरा येथील स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी वसाली येथील फगवा महोत्सवात हजारों चे जनसमुहा समोर मांडले.
पुढे ते म्हणाले की वीर हनुमंताला आपल्या शक्तीचा विसर पडला होता तसाच विसर हिंदु समाजाला झाला आहे जांबूवंता नी स्वतःच्या शक्ती ची आठवण वीर हनुमंताला करून दिली त्यानंतर प्रचंड शक्ती जागृत झाली तसाच हा हिंदु जनमानस आज निद्रिस्त अवस्थेत आहे त्याला त्याच्या शक्ती ची आठवण करून देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे ते आपण करावे तसेच ‘जो राम को लाये है हम उनको लायेंगे’ या गीत पंक्ती ची आठवण त्यांनी सर्वांना करून दिली.
वनवासी सेवा समिती जामोद व फगवा उत्सव समिती वसाली चे द्वारा या भव्य फागवा महोत्सवाचे आयोजन गेल्या चाळीस वर्षा पासून या ठिकाणी केले जाते हा चाळीस वा फगवा महोत्सव होता ७ मार्च रविवार रोजी दुपारी १२ वाजता हनुमान मंदिर समोर वसाली तालुका संग्रामपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी मंचावर बाळासाहेब काळे वनवासी सेवा समिती चे अध्यक्ष कन्हैयालाल पारीख महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.प्रतापराव जाधव,विहिंप प्रांत सहमंत्री अमोल अंधारे,भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ देशमुख, मिलिंदजी जोशी, गणेशभाऊ गोतमारे,पिड्यासिंग महाराज,वसाली सरपंच गोपाल कासदेकर,हुसेन पालकर आदी मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर हनुमंताची आरती,भारत माता व प्रभू श्रीरामचंद्र,वीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन केले गेले विहिंप प्रांत सहमंत्री अमोल अंधारे यांनी आपल्या मनोगतात धर्मांतर विरोधी कायदा करणे,गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्र शासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे यांनी जामोद येथे वनवासी बांधवां चे पाल्याकरिता चालवीत असलेल्या वस्तीगृहाची माहिती दिली सोबतच विद्यार्थ्यां वरील संस्कार त्यामुळेच आज हजारो तरुण या मधून सातपुडा पर्वत रांगेत उभे झाले आहेत.कार्यक्रमा ला हजारोंचे संख्येने वनवासी बंधू भगिनी उपस्थित होत्या.या फगवा महोत्सवाची सुरुवात जामोद येथील सेवाव्रती स्व.घनशामदासजी उपाख्य काकाजी गांधी,स्व.अजाबरावबाप्पू देशमुख,खामगांव येथील स्व.बयस गुरुजी यांनी केली होती.
या त्रयीची आठवण सगळ्या वक्त्यांनी केली.कार्यक्रमा ला प्रमुख उपस्थिती मधे ज्येष्ठ कार्यकर्ते बाप्पु करंदीकर,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा वनवासी सेवा समिती जामोद चे संचालक राजूभाऊ गांधी,विहिंप प्रांत सेवा प्रमुख बाळासाहेब घोराळे,भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश बोदडे व संघ परिवार क्षेत्रातील जिल्हा विभागातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाप्रसादा नंतर ढोल ताशे बासरी आदी विविध पारंपरिक वेशभूषेत आलेल्या वनवासी बंधू भगिनींनी नृत्या चा आनंद घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद जोशी आभार प्रदर्शन राजुभाऊ गांधी तर सूत्र संचालन ललित चांडक यांनी केले.हजारोंचे संख्येने वनवासी बंधू भगिनीं या वेळी उपस्थित होत्या.