V 24 Taas
विजय वर्मा
मलकापूर :- मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांनी रस्त्यावरच बंदुकीतून हवेत फायर करत दहशत माजवली. ही थरारक घटना रामवाडी भागात घडली असून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करीत आहेत.
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ म्हणाले की, आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्टेशनवर गंगानगर एक्सप्रेस फलाट नंबर एक वर आली असता या फलाट वर तिघेजण बसले होते. त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आरपीएफचे जवानही तेथे धावून गेले. आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्याचवेळी या तिघांनी तात्काळ रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागातील रस्त्याने एकामागे एक अंतर सोडून पळ काढला. ही बाब स्थानिकांच्या नजरेत आली.
नांदुरा रोडवर उभे असलेल्या रिक्षा प्रथम धावणारा बसला त्या मागोमाग दुसरा व तिसरा त्या रिक्षात बसून रिक्षा सरळ नांदुरा दिशेकडे निघून गेली असं चित्रांची सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. त्याचप्रमाणे रिक्षात बसलेल्या तिसऱ्या माणसाच्या पाठीमागे दोन्ही हात असून बंदूक दिसत आहे.
यासंदर्भात रामवाडी भागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ते तिघे रेल्वे स्टेशन कडून धावत येत होते दरम्यान त्यांनी हवेत फायर केला. तर पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे तिघे बहुतेक चोरटे असावेत व त्यांना पकडण्यासाठी पाठीमागे लोक धावत असावेत म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी व्यक्त करीत याप्रकरणी ते तिघे ज्या रिक्षाद्वारे गेले त्या रिक्षाचा शोध घेऊन घटना स्पष्ट झाल्यावर पुढील शोध तपास सुरू करण्यात येईल अशी माहिती सुद्धा पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिली.