V 24 Taas न्यूज नेटवर्क संग्रामपूर:- शुक्रवारी रात्री सोनाळा पोलिसांनी ग्राम टूनकी येथे गोपणीय पध्दतीने केलेल्या कारवाईत हरियाणा राज्यातील एका आरोपीचे मूसक्या आवळण्यात आल्या आहेत. अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई करीत आरोपीला ६ देशी कट्टे, १ मॅक्झिन व १ जिवंत काडतुस सह रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवार ला सोनाळा पोलिसांना अग्नि शस्त्रांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील, विनोद शिंबरे, राहूल पवार, शेख इमरान यांनी ग्राम टूनकी बु. येथील केदार नदीच्या पूलावर सापळा रचून हरियाणा राज्यातील नुहू जिल्ह्यातील सिंगार, पुन्हाना येथील २२ वर्षीय वसीम खान ईलीयास खान या आरोपीचे मूसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून ६ देशी कट्टे, १ मॅक्झिन, १ जिवंत काडतुस, १ मोबाईल असा एकूण १ लाख ८४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा घातक हत्यारांच्या तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी सुद्धा संग्रामपूर तालुक्यात देशी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्यांवर बरेचशा कारवाया करण्यात आल्या. मात्र या तस्करीतील मुख्य मास्टरमाईंट पोलिसांच्या धरपकड पासून कोसोदूर आहे. ९ डिसेंबर २०२१ ला स्थानिक गून्हेशाखेच्या पथकाने आदिवासी ग्राम जूनी वसाली येथील पूलावर मध्यप्रदेशातील दोन आरोपींकडून ३ देसी कट्टे व ६ जिवंत काडतुसे जप्त केली होती. १ फेब्रुवारी २०२३ ला स्थानिक गून्हेशाखेच्या पथकाने तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत टूनकी कडून शेगाव कडे जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला एकलारा फाट्याजवळ थांबवून चौकशी केली असता त्याच्या कमरेला पॅंटमध्ये खोसलेली देशी बनावटी पिस्टल ४ जिवंत काडतूसे सापडली होती. २० नोव्हेंबर २०२१ ला झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली. गतवर्षी जून २०२३ ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अग्नी शस्त्रांसह पकडले होते. ठाणे पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विक्रीसाठी आणलेली घातक हत्यारे सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टूनकी येथे नातेवाईकाकडे लपवून ठेवल्याची कबूली दिली होती. ३ जून २०२३ ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने सोनाळा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईत १४ देशी पिस्तूल, २५ मॅगझीन, ८ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. परप्रांतीय गून्हेगारांना कायद्याची भीती नसल्याने सातपुड्याचे नाव धूळीस मिळत आहे. गेल्या दोन वर्षात संग्रामपूर तालुक्यात अमली पदार्थांसह अग्नी शस्त्रांची तस्करी व ईतर प्रतिबंधात्मक पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठ्या कारवाया करण्यात आल्या. मात्र मुख्य सूत्रधारांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.