V 24 Taas
ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं जातंय. या अटकेवर जर्मनी आणि अमेरिकेकडून काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देण्यात आली होती. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्राने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय नागरिकांना मुक्तपणे आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करता येईल, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे.लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसह काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आलीत. यावरून संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनी गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी निवडणूक निष्पक्ष पार पडल्या पाहिजेत, असं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही आशा व्यक्त करतो की, ज्या देशांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यांच्यासह भारतातही राजकीय आणि नागरी हक्कांचे रक्षण केले जावे. यासह सर्व जनतेच्या विचारांचे आणि मतांचे रक्षण केले जावे. भारतीय नागरिकांना कुणाच्याही दबावात मतदान करावे लागणार नाही. अशी संपूर्ण जगाला आशा आहे, असं स्टीफन दुजारिक यांनी म्हटलंय.
या अगोदर केजरीवाल यांच्या अटकेवर आणि काँग्रेसचे अकाउंट फ्रीज करण्यासंदर्भात अमेरिका आणि जर्मनीने आपली प्रतिक्रिया देत मत व्यक्त केलं होतं. “अरविंद केजरीवाल यांच्यावरील केलेल्या कारवाईची आम्ही देखील दखल घेत आहोत. भारत देश लोकशाहीने चालतो त्यामुळे केजरीवाल यांना देखील निष्पक्ष न्याय मागण्याची संधी मिळेल, अशी आशी प्रतिक्रिया जर्मनीने दिली होती.
तसेच अमेरिकेने यावर बोलताना म्हटलं की, ” विरोधी पक्षनेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे आम्ही देखील केजरीवाल यांच्यावरील कारवाईवर बारिक लक्ष ठेवून आहोत. कायद्याच्या चौकटीत राहून भारतात निष्पक्षपणे मतदान होईल याची आम्हाला अपेक्षा आहे.”, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.