V 24 Taas
धुळे : शाळेत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या खर्चापोटी मुख्याद्यापकाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली. मात्र तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
धुळे तालुक्यातील कुसूंबा येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी (वय ५५) यांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. ही कारवाई १ मार्चला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेच्या आवारात झाली. तक्रारदार महिला शिक्षिका या सोशल अँड कल्चरल असोशिएशन कुसुंबे ता. जि.धुळे संचलित आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी सर्व कार्यरत शिक्षकांकडून शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांपोटी प्रत्येकी एक हजार तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आठशे रुपये मागितले होते. मात्र तक्रारदार महिला शिक्षकेने यास विरोध केल्याने त्यांना हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करू देण्यास मनाई करण्यात आली
सदर महिला शिक्षिकेला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे याबाबत तक्रार दिली. यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. दरम्यान आज (१९ मार्च) सकाळी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी दालनात एक हजारांची लाच स्वीकारताच त्यांना एसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.