अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके सामना?; मात्र राम शिंदे ठरणार ‘किंगमेकर’…

Share

V 24 Taas

अहमदनगर जिल्ह्यातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध राम शिंदे अशी कुरघोडीची लढाई गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांचा पराभव झाला आणि या पराभवाचे खापर आमदार राम शिंदेंनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फोडले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात लेखी तक्रारही त्यांनी पक्षाकडे केली होती आणि तेव्हापासूनच राम शिंदे विरुद्ध विखे आशा लढाईला सुरुवात झाली होती.

2019 च्या विधनसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव. पराभवला कारणीभूत विखे पिता पुत्र असल्याची तक्रार राम शिंदे वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. मतदारसंघातील अनेक कामावरून वेळोवेळी राम शिंदे यांची नाराजी समोर आली आहे.

जर या लोकसभा निवडणुकीत डॉ.सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांची लढत झाली तर यामध्ये आमदार राम शिंदे यांचा सहभाग मोठा महत्त्वाचा राहणार आहे. कर्जत जामखेड तालुक्यात आमदार राम शिंदे यांच्या विचाराला मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. तर पुन्हा एकदा विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यामुळे आमदार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी आली आहे.

आमदार राम शिंदे यांची नाराजी विखे यांना परवडणारी नाही, त्यामुळेच सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट राम शिंदे यांच्या घरी जाऊन जवळपास दीड तास चर्चा केली. राम शिंदे यांची नाराजी दूर करणे हेच आता विखे पिता पुत्रांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

तर आमदार राम शिंदे यांच्यामुळे कर्जत जामखेड श्रीगोंदा तालुक्यातही मतदानावर परिणाम पडू शकतो त्यामुळे आमदार निलेश लंके यांना राम शिंदे यांच्या मैत्रीचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आता राम शिंदे मैत्री जपणार की पक्षाचे काम करणार हेच पाहणे उचित ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *