V 24 Taas
जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम अद्यापही बाकी आहे. त्याबाबत आज किंवा उद्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. तसेच तीन पक्षांमधील जे जागावाटप आहे, ते आम्ही पूर्ण करू”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले आहेत की, ”भाजपच्या वाटेल ज्या जागा आल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहे, याबाबतची मांडणी आम्ही याआधीही भाजप केंद्रीय निवडणूक समितीसमोर केली आहे. त्यामुळे ज्या सुटलेल्या जागा आहेत, त्यासंदर्भात सीईसी निर्णय घेईल. तसेच ज्या जागा सुटू शकतात, त्यासंदर्भात पुढील सीईसी किंवा अध्यक्षांना अधिकार दिला तर त्यांच्या संमतीने जागावाटप जाहीर होईल.”